आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi May Fight Independent From Pune Loksabha

विश्वजित कदमांना पाठिंबा की बंड; कलमाडी आज काय निर्णय घेणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बहुचर्चित पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले खासदार सुरेश कलमाडी यांच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. आज दुपारनंतर कलमाडी यांनी आपल्या समर्थकांना 'कलमाडी हाऊस'वर बोलावले असून, त्याच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे कलमाडी यांनी सांगितले आहे. दरम्यान, कलमाडी बंडखोरी करणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते विश्वजित कदम यांना अंतिम क्षणी पाठिंबा देतील असे सांगण्यात येत आहे.
सुरेश कलमाडी यांचे गुरुवारी लोहगाव विमानतळावर आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागतानंतर समर्थकांनी कलमाडींची उघड्या जिप्सी जीपमधून मिरवणूक काढली. त्यावेळी पत्रकारांनी लोकसभा लढविणार का असे प्रश्न विचारले मात्र, कलमाडी यांनी गोल-गोल उत्तरे देत समर्थकांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. काँग्रेसने कदम यांना उमेदवारी दिल्याने कलमाडी नाराज आहे. पक्षाने आपल्याला तिकीट दिले नाहीच पण आपले मतही विचारात घेतले नसल्याने ती भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळेच आपली ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी कलमाडींनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामुळे कलमाडी बंडखोरी करणार व अपक्ष निवडणूक लढविणार असे मानले जात आहे. मात्र, कलमाडींच्या काही समर्थकांनी कदम यांना पाठिंबा द्यावा, असा सूर लावला आहे.
निवडणूक लढवून काहीही हासील होणार नाही याऊलट कदम यांना पाठिंबा पक्षाच्या संघटनेवर कलमाडींनी वर्चस्व ठेवावे व भविष्यकाळाकडे पाहावे, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, एक गट कलमाडींनी लोकसभा लढवावी व पक्षाला ताकद दाखवून दयावी या मताचा आहे. याचमुळे कलमाडींनी आज दुपारनंतर कलमाडी हाऊसवर बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी समर्थकांशी सल्ला मसलत करून कलमाडी निर्णय जाहीर करणार आहेत. मात्र, कलमाडी यांच्या जवळच्या पदाधिक-याने आमच्याशी बोलताना सांगितले की, खासदार कलमाडी यांना तिकीट न दिल्याने किंवा त्यांना विचारत न घेता तिकीट दिल्याने ते काँग्रेसवर नाराज आहेत. मात्र, आम्ही त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देणार आहोत. हा काँग्रेस पक्ष आहे. तेथे शांत रहावे लागते. एक संधी हुकली तर भविष्यकाळ आपल्या हातात येऊ शकतो. त्यामुळे सध्या स्थितीत कदम यांना पाठिंबा देण्याबरोबर पुणे काँग्रेस संघटना पातळीवर आपले वर्चस्व ठेवण्याची अट घालावी अशी मागणी करणार आहोत.
पुढे वाचा, विश्वजित कदमांसाठी अजित पवार का सरसावले?...