आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पुणे फेस्टिव्हल'चे निमित्त साधून सुरेश कलमाडी करणार राजकारणात पुनर्प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘पुणे फेस्टिव्हल’च्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्याच्या सार्वजनिक जीवनात जोरदार पुनरागमन करण्याचे नियोजन केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री व भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष हेमा मालिनी यांना नियोजन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. कायदामंत्री व कॉँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे.


या सोहळ्याला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, काँग्रेसचे नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील या नेत्यांसह इटलीचे राजदूत डॅनियल मॅनसिनी हे उपस्थित राहतील. फेस्टिव्हलचे निमित्त साधून काँग्रेस नेत्यांचा मेळावाच आयोजित केला जातोय का? या प्रश्नावर कलमाडी म्हणाले, हा पूर्णत: सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या निमित्ताने पुण्याचे सांस्कृतिक विश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांना मी आमंत्रित करत असतो. गेल्यावर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन केले होते,’ असे ते म्हणाले.


‘कलमाडी महोत्सवा’त उत्साह
कॉँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजयसिंह यांनी कलमाडी माझे मित्र असून राष्ट्रकुल घोटाळ्यातून ते निश्चितपणे सुटतील, असे पुण्यात जाहीरपणे सांगितले होते. आता फेस्टिव्हल उद््घाटनाला कायदामंत्री सिब्बल स्वत: येत असल्याने पक्षांतर्गत पातळीवर कलमाडींना बळ दिले जात असल्याची समर्थकांत चर्चा आहे. फेस्टिव्हल पुर्णत: कलमाडींच्या संकल्पनेतून चालणारा उत्सव आहे.


पंचतारांकित बैठक
फेस्टिव्हलचे स्वरुप ठरवण्यासाठी बुधवारी पुण्याच्या तारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात काँग्रेस व विरोधी पक्षाचे नगरसेवक, आमदार होते. महाराष्ट्र बँकेसह केंद्र, राज्याच्या पर्यटन विभागाने प्रायोजकत्व दिले आहे.
हे विशेष. आयोजनाच्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद पाहून कलमाडीही सुखावल्याचे दिसून आले.