आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवक सुशील मंचरकरला अटक; खुनासाठी आरोपींना कोर्टाच्या जवळून पळवल्याचे उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
पुणे- राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर यांना कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अॅड. सुशील मंचरकर यांच्यासोबत अन्य दोघांनाही पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
विविध गुन्ह्याखाली अटक केलेले दोन आरोपी पिंपरी येथील मोरवाडी न्यायालयातून पळून गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही पकडल्यानंतर त्यांनी अॅड. सुशील मंचरकर यांनी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी अॅड. सुशील मंचरकर यांना अटक केली. मंचरकर व पकडलेल्या दोन्ही गुन्हेगारांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांनाही मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अॅड. सुशील मंचरकर यांच्या पत्नी गीता मंचरकर राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्या गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. काँग्रेसचे माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम आणि अॅड. सुशील मंचरकर हे एकाच पक्षात असूनही, त्यांच्यात राजकीय पूर्ववैमनस्य निर्माण झाले. त्यातून कदम गटाच्या महिलांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये नगरसेविका गीता मंचकर यांच्यावर भर सभेत हल्ला केला होता. काही महिन्यांपूर्वीच कैलास कदम यांचे बंधू व काँग्रेसचेच माजी नगरसेवक सद्गुरू कदम हे खुनाच्या गुन्ह्यात जेलवारी करून बाहेर आले आहेत. आता कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी अॅड. सुशील मंचरकर यांना अटक झाली आहे.
 
     
बातम्या आणखी आहेत...