आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swabhimani Party State President Sadabhau Khot Comment On Chhagan Bhujbal

गैरव्यवहार: साखर कारखान्यांच्या विक्रीत नऊ हजार कोटींचा भ्रष्टाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झालेल्या साखर कारखान्यांच्या विक्रीत ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील साखर कारखाना विक्री व्यवहाराची चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) करण्याची मागणी 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

तुरुंगवासी ‘राष्ट्रवादी’ नेते छगन भुजबळ यांनीही आघाडी सरकारच्या काळात ३५ पैकी एक कारखाना कवडीमोल भावाने विकत घेतल्याचे ईडीच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यांच्यासारखे अनेक ‘भुजबळ’ अजूनही समाजात उजळमाथ्याने फिरत आहेत. या सर्वांना गजाआड करण्यासाठी कारखाना विक्रीची ईडीतर्फे चौकशी होणे आवश्यक आहे, असे खोत म्हणाले.

खोत यांनी सांगितले, की काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ३५ सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकले गेले. या कारखान्यांची यंत्रसामग्री आणि जमीन यांची बाजाराभावाने होणारी किंमत १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात अवघ्या एक हजार कोटी रुपयांमध्ये हे सहकारी कारखाने विकण्यात आले. विकण्यात आले. सहकारी कारखाने विकत कोणी विकत घेतले, त्या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत, या कंपन्यांचे भागधारक कोण हे जनतेला कळायला हवे. यासाठी सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

दर देता येत नसेल तर शेतकऱ्यांना साखर द्या
साखरेचा बाजार तेजीत असल्याचे खोत यांनी सांगितले. ते म्हणाले, “कारखान्यांनी साखरेची विक्री करुन शेतकऱ्यांची उर्वरित २० टक्के एफआरपी तातडीने द्यावी. तातडीने द्यावी, अशी मागणी खोत यांनी केली. पहिल्या टप्प्यात ८० टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात २० टक्के एफआरपी देण्याचा फॉर्म्युला नागपुरात ठरला तेव्हा साखर २२०० रुपये क्विंटलने विकली जात होती. आता साखरेचे दर ३८०० रुपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. त्यामुळे १ मेपर्यंत उसाची सर्व किंमत शेतकऱ्यांना देण्यात कारखान्यांना कोणतीही अडचण नाही.” अजूनही शेतकऱ्यांना कारखान्यांकडून ३ हजार कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. कारखान्यांकडे २२ हजार कोटींची साखर शिल्लक आहे. पैसे देणे शक्य नसेल तर कारखान्यांनी तितक्या रकमेची साखर शेतकऱ्यांना द्यावी. आम्ही त्यासाठीही तडजोड करण्यास तयार आहोत असेही खोत म्हणाले.

...तर न्यायालयात जाणार
“काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात विकल्या गेलेल्या कारखान्यांचे खरेदीदार कोण याची यादी सरकारला दिली आहे. सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.”
–सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष,

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुस्तकी पांडित्य नको
ऊस आणि कापूस हे पीक दुष्काळाला जबाबदार असल्याचे अनेक विद्वान सांगू लागले आहेत. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना अशा विद्वानांचे पीक जोरात आले आहे. शेतीची काही माहिती नसताना केवळ पुस्तकी ज्ञान असल्याने सर्वच क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यासारखे हे विद्वान बोलू लागले आहेत, अशी टीका खोत यांनी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यावर केली.