आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी संघटनेचा भाजपशी ‘काडीमाेड’; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्ता साेडली: राजू शेट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘शेतकऱ्यांचे  प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अटीवरच स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी झाली होती. कारखानदारांकडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर व्हावा, स्वामिनाथन समितीच्या  शिफारशी लागू कराव्यात, या आशेने आम्ही सत्ता सरकारमध्ये असलेले व त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्यांना साथ दिली. पण सत्तांतर घडून साडेतीन वर्षे झाली तरी या नेत्यांनी अामच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. आमचे  प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळे यापुढे  कोणत्याही राजकीय पक्षापासून ‘अंतर’ राखून आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून लढाई देण्याचे  एकमताने ठरवले आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या काही महिन्यांपासून भाजपशी नाराज असलेल्या राजू शेट्टी यांनी अखेर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या संघटनेकडून मंत्रिपद मिळालेले सदाभाऊ खाेत यांच्याशी शेट्टींची बिनसलेले अाहे. काही दिवसांपूर्वीच खाेत यांची संघटनेतून हकालपट्टीही करण्यात अाली. संघटनेकडून मिळालेले मंत्रिपद खाेत यांनी साेडावे अशी शेट्टींची इच्छा हाेती, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले. मात्र अापल्याला भाजपकडून अामदारकी व मंत्रिपद मिळाले असल्याचे सांगत खाेत यांनी मंत्रिपद साेडण्यास नकार दिला हाेता. दरम्यान, ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची घाेषणा केल्यानंतर संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे  अध्यक्षपद ४ तारखेला साेडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सरकारी घर आणि वाहन बुधवारीच सरकारकडे जमा केले आहे.

शेतकरी एकत्रित करणार
‘व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही संघर्ष केला, धडपडलो. पण या सरकारने फक्त आश्वासने दिली. ती पूर्ण करण्यात ते कमी पडले आहेत. राज्य आणि केंद्र पातळीवर हेच चित्र आहे. त्यामुळे  पक्ष म्हणून आम्ही आता थेट रस्त्यावर उतरणार आहोत. त्यासाठी  राज्य आणि देश पातळीवरील शेतकऱ्यांचे  विराट संघटन करण्याचा  निर्धार आहे. 

दावी तोडा, बाहेर पडा
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना  ‘कुणाचे वेगळे मत आहे का’ असे विचारले. त्यावर टाळ्या वाजवून त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत कार्यकर्त्यांनी ‘दावी तोडा’ असा गजर केला.  त्याानंतर शेट्टींनी राज्यातील भाजप सरकारबरोबरचे संबंध तोडत असल्याचे जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...