आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swabhimani Shetkari Sagtana Accept The Challenge Of Sharad Pawar

शरद पवारांचे आव्हान \'स्वाभिमानी\'ने स्वीकारले, दौलत कारखाना चालवून दाखवू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काही लोक प्रतिटन ऊसाला तीन हजार रूपये द्या, साडेतीन हजार रूपये द्या अशी मागणी करतात. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत सहकारी साखर कारखाना चालविण्यास द्या, अशी कोपरखळी कृषिमंत्री शरद पवारांनी नाव न घेता राजू शेट्टींना मारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पवारांचे आव्हान स्वीकारले आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी याबाबत आज पंढरपुरात आम्ही दौलत साखर सहकारी कारखाना चालविण्यास तयार असल्याचे सांगितले.
शरद पवारांनी रविवारी पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस दर आणि ऊस दराच्या आंदोलनावर भाष्य करीत राजू शेट्टी यांचे नाव न घेता सडकून टीका केली होती. पवार म्हणाले होते, की काही व्यक्तींकडून ऊसाबाबत आणि त्याच्या अर्थकारणाबाबत चुकीची माहिती मांडली जाते. यातून साखर कारखानदार आणि सहकार क्षेत्राला बदनाम केले जाते. टीव्ही वाहिन्यांवरून काहीही सांगितले जाते. ऊसाला तीन हजार दर द्या, कोणी म्हणते साडेतीन हजार रूपये दर द्या. पण वस्तुस्थिती तशी नाही.
साखरेचे भाव कोसळल्यामुळे कारखाने शेतक-यांना तेवढा दर देऊ शकत नाहीत. मग कारखानदार चोर असल्याचे आरोप केले जातात. हे आरोप देश पाहतो आणि पाहणा-यांना कारखान्यांचे अर्थशास्त्र माहित नसते. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींबाबत व आपल्या राज्याबाबत इतर राज्यात गैरसमज निर्माण होतो. त्याला उत्तर देण्याची जबाबदारी साखर संघाची आहे. मात्र ते कधीच पुढे येत नाहीत.
पुढे वाचा, शेतक-यांचा गैरसमज दूर करण्यासाठी पवारांनी काय उपाय सुचविले आहेत कारखानदारांना...