आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्वाइन फ्लूमुळे 2 महिलांचा मृत्यू; 16 दिवसात 12 जणांचा बळी, राज्यातील आकडा 49 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वाइन फ्लू’मुळे  2 महिलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 16 दिवसात स्वाइन फ्लूने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत स्वाइन फ्लूने 49 जणांचा बळी गेला आहे.

स्वाइन फ्लूचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. निगडी येथील 63 वर्षीय महिलेवर 13 सप्टेंबर आणि आकुर्डीतील 50 वर्षीय महिलेवर 4 सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अतिदक्षता विभागात 3 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने 10 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या 25 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
 
ही लक्षणे आढळल्यास तातडीने भेटा डॉक्टरांना
सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्यविभाग आणि डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...