आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमीर खान, किरण राव यांच्यानंतर प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर स्वाईन फ्लूमुळे गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकलेले नाहीत. - Divya Marathi
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर स्वाईन फ्लूमुळे गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकलेले नाहीत.
पुणे- बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे जावडेकर गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकलेले नाहीत.
 
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्याला आणि किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिलादेखील स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले होते. आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजते आहे. जावडेकर यांच्यावर त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी उपचार सुरु आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...