आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा सार्क परिषदेला न जाण्याचा निर्णय चुकीचा : स्वामी अग्निवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दक्षिण अाशियार्इ प्रादेशिक संघटनेच्या (सार्क) परिषदेला न जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा निर्णय चुकीचा होता. काेणतेही संकट अाले तरी चर्चा करणे हा एकच मार्ग असताे. त्यामुळे पाकिस्तानसाेबत चर्चा कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ अायाेजित वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष याेगेश कुटे उपस्थित हाेते.

अग्निवेश म्हणाले, गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तानमध्ये जाऊन आले. मात्र, पंतप्रधान माेदींनी संकुचित भूमिका घेत सार्कला न जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे परराष्ट्र धाेरण अपयशी ठरले अाहे. सर्जिकल स्ट्राइक लष्कराने केले असून त्याबाबत सर्वांना अभिमान अाहे. मात्र, सध्या त्याचे श्रेय एक पक्षच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करा
यूपीएच्या काळात नक्षलग्रस्त अाठ राज्यांचे प्रमुख म्हणून पी-चिंदबरम कार्यरत हाेते. त्यांनी माअाेवाद्यांशी चर्चा करण्यासाठी मला पाठवले हाेते. मी बोलल्यानंतर त्यांचा प्रवक्ता राजकुमार सरकारशी चर्चा करण्यास तयार हाेता. मात्र, बनावट चकमकीत मारले गेले. त्यामुळे चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...