आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरपत्नी स्वाती महाडिकांची लष्करी प्रशिक्षणासाठी निवड, प्रशिक्षणानंतर हाेणार अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले साताऱ्याचे भूमिपुत्र कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती याही लष्करात अधिकारी बनण्यासाठी पात्र ठरल्या अाहेत. या पदासाठी घेण्यात अालेल्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या असून पुढील प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे. पतीचे स्वप्न आपण साकार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

संताेष शहीद झाल्यानंतर स्वाती यांनी अापणही लष्करात जाण्याचा मनाेदय बाेलून दाखवला हाेता. त्यांची जिद्द पाहून लष्करानेही त्यांना वयाच्या अटीत सूट दिली हाेती. कसून तयारी केल्यानंतर शाॅर्ट सर्व्हिस कमिशन वुमन (नॉन टेक्निकल) या अभ्यासक्रमासाठी स्वाती यांची निवड झाली आहे. ही गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. ४९ आठवड्यांचे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सैन्यदलात त्यांना लेफ्टनंट ही रँक मिळेल. पुण्याच्या एका संस्थेत त्यांनी एसएसबी मुलाखतीचे प्रशिक्षण घेतले होते. स्वाती यांच्यासोबत निधी मिश्रा या वीरपत्नीचीही सैन्यदलातील या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...