आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत होती शिक्षिका, पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनली लेफ्टनंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेफ्टनंट पदावर रूजू होताच स्वाती आपल्या दोन्ही मुले कार्तिकी आणि स्वराजसोबत.... - Divya Marathi
लेफ्टनंट पदावर रूजू होताच स्वाती आपल्या दोन्ही मुले कार्तिकी आणि स्वराजसोबत....
पुणे/चेन्नई- सातारायेथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती (३८) आणि मध्य प्रदेशच्या सागरचे शहीद नायक मुकेश दुबे यांच्या पत्नी निधी (२९) लष्करी अधिकारी बनल्या आहेत. शनिवारी त्यांनी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत एका वर्षाचे प्रशिक्षण पासिंग आऊट परेडसह पूर्ण केले. कर्नल संतोष महाडिक ४१ व्या राष्ट्रीय रायफल्स कमांडिंग अधिकारी होते. ते २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले होते. महार रेजिमंेटचे सैनिक मुकेश दुबे यांचे २००९ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. या दुर्दैवी घटनांनंतर स्वाती आणि निधी यांनी पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. 
 
 
स्वातीचे नाकारल्या सवलती...
- स्वाती लवकरच त्या पुण्यातील देहूरोड येथे पोस्टिंगवर रूजू होणार आहेत. लष्करात दाखल होण्यासाठी शासन, लष्कराकडून सहानुभूतीची अपेक्षा नाही. सवलतीही नकोत. फक्त भरती प्रक्रियेसाठीची वयाची अट शिथिल करावी, अशी मागणी स्वाती यांनी केली होती.
- त्यानंतर त्यांनी हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींसाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा दिल्या.
- गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी चेन्नई लष्करी केंद्रात प्रवेश मिळवला.
- स्वराज आणि कार्तिकी या दोन मुलांपासून काही काळ दूर राहत त्यांनी जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण केले.
 
शिक्षकी पेशा सोडत आर्मीत भरती होण्याचा निर्णय-
 
- 7 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
- मात्र, वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी धीर सोडला नाही. उलट ज्या दहशतवाद्यांशी लढत पतीने हौतात्म्य पत्करले त्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी लष्करात दाखल होण्याचा निश्चय केला व आज ते सत्यात उतरवले.
- मूळ शिक्षकी पेशात असलेल्या स्वातींनी चेन्नई येथे अकरा महिन्यांचे खडतर असे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
- वास्तविक कर्नल पदावरील अधिकाऱ्याला हौतात्म्य येण्याची घटना दुर्मिळ असते. संतोष यांच्याबाबतीत हा दुर्धर प्रसंग ओढवला. त्यानंतर शिक्षिका असलेल्या स्वाती यांचे आयुष्यच बदलून गेले.
- पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती यांनी अशा कसोटीच्या क्षणी सैन्यात जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
 
दहशतवादाविरूद्ध लढणार-
 
- सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडीचे कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्म्यानंतर लेफ्टनंट बनलेल्या स्वाती म्हणाल्या,  ‘एव्हरी ऑफिसर इज सोल्जर अँड एव्हरी सोल्जर इज ऑफिसर, हे कर्नल संतोष यांच्या बटालियनचे ब्रीदवाक्य होते.
- त्यानुसारच मी काम करेन. कर्नल संतोष यांच्या इच्छेप्रमाणेच देशसेवा, मातृसेवा आणि समाजसेवेला माझे प्राधान्य असेल. 
- दहशतवादाचा देशासमोर मोठा धोका आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो.
- या दहशतवादाविरुद्ध संघर्ष करण्यासाठीच मी लष्करात दाखल झाले आहे, असेही लेफ्टनंट स्वाती महाडिकांनी सांगितले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, स्वाती महाडिक यांच्यासंबंधित छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...