आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swedish Prime Minister’s Visit, Says Pune & Sweden Have Special Bonding

पुणे इंडस्ट्रियल हब, स्वीडनसाठी महत्त्वाचे शहर- स्वीडिश PM लोव्हेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील चाकण परिसरातील स्वीडिश कंपनी टेट्रा पॅकच्या प्रकल्पाला पंतप्रधान स्टीफन लोव्हेन भेट दिली. - Divya Marathi
पुण्यातील चाकण परिसरातील स्वीडिश कंपनी टेट्रा पॅकच्या प्रकल्पाला पंतप्रधान स्टीफन लोव्हेन भेट दिली.
पुणे- पुणे शहर हे भारतातील प्रमुख इंडस्ट्रियल हब आहे. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आमच्या देशासाठी पुणे शहर महत्त्वाचे असणार आहे, असा विश्वास स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांनी व्यक्त करीत पुणे शहरावर स्तुतीसुमने उधळली.
स्वीडिश पंतप्रधान लोव्हेन दोन दिवसीय भारत भेटीवर होते. शनिवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया वीकच्या मुख्य समांरभाला लोव्हेन यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी सकाळी लोव्हेन यांनी पुण्याला भेट दिली. पुण्यातील चाकण परिसरातील स्वीडिश कंपन्या टेट्रा पॅक आणि एरिक्सन या कंपन्यांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यावेळी पुणे परिसरातील पायाभूत सुविधा व इंडस्ट्रियल हब होण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवा-सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पुणे शहर लवकरच जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास व्यक्त केला.
लोव्हेन म्हणाले, भारत वेगाने प्रगती करतो आहे. औद्योगिक घौडदौड जोरात सुरु आहे. यापूर्वी मी पुण्यातील सॅंडविक कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि डिझिटल इंडियाचे उपक्रम बेंचमार्क ठरतील. आमची स्वीडिश कंपनी एरिक्सनचा प्लाँट पुण्यात असून तो डिझिटल इंडियासाठी मोठे योगदान देणार आहे. भारत सरकारच्या नविन विविध उपक्रमांमुळे स्वीडन आणि भारत देशाला एकमेंकाशी व्यवसाय, व्यापार करण्याची मोठी संधी आहे. याचा आम्हाला मोठा फायदा होणार आहे. उत्पादन, नवनिर्मितीसाठी भारत-स्वीडन एकमेंकाच्या हातात हात घालून काम करतील व यातून सर्वांना शाश्वत विकास साधता येईल. ट्रेटा पॅक कंपनी भारतात महत्त्वाचे योगदान देत आहे. या कंपन्यांच्या उत्तम पॅंकिगमुळे ग्रामीण भागातील दुध, अन्न, फळे व इतर पदार्थ लोकांपर्यंत पोहचण्यात मदत होत असल्याने मला आनंद झाला आहे तसेच आमच्या कंपनीचा अभिमानही वाटत असल्याचे लोव्हेन यांनी सांगितले.
भारत-स्वीडन या दोन्ही देशाचे अनेक वर्षापासून उत्तम संबंध आहेत. हे संबंध ऐतिहासिक ठरवून ते दिवसेंदिवस वृद्धींगत कसे करता येतील यासाठी माझे सरकार कायमच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देत मेक इन इंडिया, डिझिटल इंडिया, मेक्स फॉर इंडिया आणि क्लीन इंडिया आदी सर्व उपक्रमांना सहकार्य करेल असे स्टीफन लोव्हेन यांनी सांगितले.
पुढे पाहा, रविवारी स्वीडिश पंतप्रधान लोव्हेन यांनी काय काय केले... पाहा क्षणचित्रे...