आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swimming Accident In Pune\'s Mastani Lake, 2 Youth Died

लग्नाची बॅचरल पार्टी साजरी करायला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू, एक वाचला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहराबाहेरील दिवे घाटात असलेल्या वडकीतील मस्तानी तलावात आज पहाटे दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाची बॅचरल पार्टी साजरी करायला गेले असताना ही घटना घडली आहे. सुनील गणेश गायकवाड (वय 26, रा. फातिमानगर, हडपसर) व नितेश अनिल एलपुर (वय 24, रा. वानवडी) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील गायकवाड याचे पाच दिवसानंतर लग्न होते. त्यामुळे सुनीलच्या मित्रांनी त्याच्याकडे लग्नापूर्वीची बॅचरल पार्टी मागितली. त्यानुसार सुनील व त्याचे चार मित्र वडकी परिसरातील मस्तानी तलाव परिसरात पार्टीसाठी शनिवारी रात्री गेले होते. रात्री दारूची पार्टी केल्यानंतर आज पहाटे सहाच्या सुमारास यातील तिघे जण तलावात पोहण्यास उतरले. मात्र, दारूची नशा न उतरल्याने व पाण्यात गेल्यावर दम लागल्याने सुनील व नितेश बुडून मृत्यू पावले. तर, नावेद इरफान शेख ( वय 24, रा. कॅम्प) हा मात्र कसा बसा तलावाच्या कडेला पोहचण्यात यशस्वी झाला. त्यांच्यासमवेत रमेश नितीन धेंडे आणि रितेश रमाकांत कांबळे हे मित्रही होते. मात्र या दोघांना पोहता येत नसल्याने हे तलावाच्या काठावरच बसून होते. मात्र, आपले मित्र बुडत असताना पोहता येत नसल्याने त्यांच्याकडे पाहण्याखेरीज ते काहीही करू शकले नाहीत. अखेर सुनील व नितेश यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर पोलिस व अग्निशमन दलाचे जवान तलावाकडे दाखल झाले. दोघांचेही मृतदेह दुपारी हाती लागले.