आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीकडून तरुणावर तलवारीने हल्ला, बारामतीमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - जुने भांडण उकरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीने तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना बारामती येथील आमराई येथे घडली. याप्रकरणी सुरेखा बबलू बगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र ती फरार झाली आहे.
 
हल्ल्यात सागर भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.  गेल्या काही वर्षांपासून बगाडे आणि भोसले यांच्यात भांडणे आहेत.  बुधवारी रात्री भोसले हा घरी जात असताना सुरेखाने जुना वाद उकरून काढला. त्यानंतर तिच्यासह काही जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.   
बातम्या आणखी आहेत...