आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पबच्या बाहेर खुलेआम काढण्यात आली मुलींची छेड, बेल्टनेही करण्यात आली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन विद्यार्थ्यांना रस्त्यात मारहाण करण्यात आली. - Divya Marathi
दोन विद्यार्थ्यांना रस्त्यात मारहाण करण्यात आली.
पुणे- सुरक्षित शहर असा नावलौकिक असणाऱ्या पुण्यात पबच्या बाहेर खुलेआम मुलींची छेड काढण्यात आल्याची घटना घडली आहे. छेड काढण्यास विरोध करणाऱ्या मुलींना यावेळी मारहाणही करण्यात आली. 
 
छे़ड काढण्यात आल्याने झाली वादाला सुरुवात
पुण्याचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, 5 जुलै रोजी रात्री अकरा वाजता सिंम्बोयसिस विधी महाविद्यालयातील पार्थ व्यास आणि शांतनु रॉय हे आपल्या मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्क येथील गैस्ट्रो या बारमध्ये गेले होते.
- त्याठिकाणी प्रणव दातार हा आपल्या काही मित्रांसोबत आला होता. त्याने व त्यांच्या मित्रांनी पार्थ व्यास याच्या मैत्रिणीची छेड काढली. त्यानंतर पार्थ आणि शांतनु यांनी याची तक्रार बार मॅनेजरकडे केली. त्यानंतर मॅनेजरने दातार आणि त्याच्या मित्रांना बारच्या बाहेर काढले.
- या गोष्टीने नाराज झालेला दातार आणि त्यांचे मित्र बार बाहेर पार्थ आणि शांतनुची वाट पाहत थांबले. ते बाहेर पडताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी मुलांना विटेने आणि मुलींना बेल्टने मारहाण केली. 
- पार्थ जखमी झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
पाच पैकी तीन आरोपींना अटक 
- पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाच जणांविरुध्द कलम 326, 354, 506, 323 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिसांनी पाच पैकी 3 जणांना अटक केली आहे. 
- अटक केलेल्या आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
 
मारहाणीचा व्हिडिओ आला समोर
आरोपी युवक मारहाण करत असल्याचा या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
- या व्हिडिओत मुली स्वत:ला वाचविण्यासाठी आरडाओरड करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पबमधील एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलवर शुट केला आहे.
- या व्हिडिओमुळेच आरोपींची ओळख पटू शकली. पब कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या युवकांना पबच्या बाहेर काढले तेव्हा त्यांनी त्यांनाही मारहाण केली. 
बातम्या आणखी आहेत...