(संग्रहित छायाचित्र)
पुणे- पुणे- बंगळुरू महामार्गावरील साता-याजवळील खंबाटकी घाटात आज सकाळी 10 च्या सुमारास एक टॅंकर उलटला आहे. या घटनेमुळे पुण्याकडून साता-याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. संबंधित टॅंकर पुण्याहून साता-याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी खंबाटकी घाटात हा टॅंकर उलटला. सध्या महामार्ग पोलिस सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने रस्त्यावर अडवा पडलेला टॅंकर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावरून मोठी वाहतूक होत असल्याने व ती ठप्प झाल्याने साता-याकडे जाणा-या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे सध्या चित्र आहे. टॅंकरची पलटी कशी झाली हे अद्याप समोर आले नाही.