आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आणखी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी-विशालनगर परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विषारी औषध प्राशन करून या तरूणीने जीवनयात्रा संपवली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, ती विवाहित असून तिचा पती ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.
तपस्या भास्कर (31, बोरा हॅपी होम, जगताप डेअरी, मूळ- जयपूर, राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. तिने शुक्रवारी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तपस्या भास्कर ही हिंजवडीतील एका आयटी कंपनीत काम करत होती. सध्या ती जगताप डेअरी-विशालनगर परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी दुपारी फ्लॅटचे मालक हिरमेश नांदगुडे हे भाडे मागण्यासाठी गेले होते. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. मात्र आतून प्रतिसाद आला नाही. शेजा-यांकडे चौकशी केली असता तपस्या शुक्रवारपासून दिसली नसल्याचे आणि तेव्हापासून फ्लॅट बंद असल्याचे समजले. त्याच वेळी दरवाजाला बाहेरून लॉक नसल्याचे नांदगुडे यांच्या लक्षात आले. फ्लॅटमधून कसला तरी वास येत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नांदगुडे यांनी आपल्या मित्रांसह पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला असता तपस्या मृत अवस्थेत आढळून आली. मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली सापडली. पण तिच्या रूममध्ये सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी तपस्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तपस्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तपस्याच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. आज (सोमवार) सकाळी ते पुण्यात दाखल झाले.
बातम्या आणखी आहेत...