आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मोटर्सचे MD कार्ल स्लिम यांचे बॅंकॉक येथे अपघाती निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ पुणे- टाटा मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्ल स्लिम यांचे बॅंकॉकमध्ये अपघाती निधन झाले. स्लिम कंपनीच्या थायलंडमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी गेले होते. 51 वर्षाचे स्लिम 2012 मध्ये टाटा मोटर्समध्ये रूजू झाले होते. मंदीच्या काळात कंपनीला फेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. टाटा मोटर्सने याबाबत एक निवेदन जारी करून स्लिम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, बॅंकॉकमधील एका हॉटेलमधील उंच मजल्यावरून पडून स्लिम यांचा मृत्यू झाला आहे.
टाटा मोटर्सचे चेअरमन सायरस पी मिस्त्री यांनी स्लिम यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मला तुम्हाला ही माहिती देताना खूप दु:ख होत आहे की टाटा मोटर्सचे एमडी कार्ल स्लिम यांचे आकस्मिक आणि दुखद निधन झाले आहे. स्लिम कंपनीच्या संचालक मंडळाच्या टाटा मोटर्स थायलंड लिमिटेड कंपनीच्या बैठकीसाठी गेले होते.
टाटा मोटर्समध्ये रूजू होण्यापूर्वी स्लिम यापूर्वी चीनमधील एसजीएमडब्ल्यू मोटर्समध्ये कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्याआधी 2007 ते 2011 या काळात त्यांनी भारतातील जनरल मोटर्सचे ते अध्यक्ष व कार्यकारी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते.