आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेेचे बुजगावणे; आमचे नेतृत्व शक्तिशाली- तटकरेंची सेनेवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- शिवसेना हे एक बुजगावणे असून भाजपच्या धोरणांवर टीका करणारी शिवसेना फक्त बोलघेवडी असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे केली. शिवसेना सरकारमध्ये सहभागी असली तरी सामील नाही. सरकार म्हणून शिवसेनेची सामूहिक जबाबदारी असताना सरकारवरच टीका करण्यामागचा सेनेच्या भूमिकेचा राजकीय अर्थ महाराष्ट्रातील जनतेला समजतो, असेही ते म्हणाले.

तटकरे म्हणाले, निवडणुकांनंतर विरोधी पक्ष तर महिनाभरातच सहयोगी पक्ष या दोन्ही भूमिका वठवणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. तर राष्ट्रवादीची नाळ सर्वसामान्यांपर्यंत रुजली आहे. अजित पवार हे एक शक्तिशाली नेतृत्व बनत आहे. भाजपने नो-बाल, स्टंप आऊट, रन आऊट, त्रिफळा अथवा तिसऱ्या पंचाने यापैकी कशाने शिवसेनेला आऊट केले त्यांनाच ठाऊक नाही. विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी लढा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपला पाठिंबा देण्याचा विचार नाही
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर निवडणुकांनंतर तातडीने दिल्लीप्रमाणे मध्यावधी निवडणुका लादणे योग्य नव्हते. म्हणून अल्पमतातील भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची भूमिका होती. शिवसेनेने आता पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्याऐवजी निवडणुकांना सामोरी जाईल, असेही ते म्हणाले.