आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : TCS च्‍या IT कर्मचाऱ्याने घेतली फाशी, मित्रांना पाठवला गळफास लावलेला सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्‍यातील टीसीएसचा आयटी कर्मचारी अभिषेक कुमार याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली आहे. आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी गळयात फास टाकलेला एक सेल्‍फीही  त्‍याने मित्रांना पाठवला. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे अभिषेकने ज्‍या मित्रांना सेल्‍फी पाठवला, त्‍यातील काहीजण बाजुच्‍याच फ्लॅटमध्‍ये होते. 
 
मित्रांसोबत राहत होता अभिषेक 
- 23 वर्षांचा अभिषेक कुमार पुण्‍यातील टाटा कन्‍सलटंसी सर्व्हिसेसमध्‍ये नोकरी करत होता.
- गुरुवारी सकाळी 11.30 वाजता बेडशीटच्या मदतीने पंख्‍याला फास लावून घेत, त्‍याने आत्‍महत्‍या केली.
- पुण्‍यातील संगरिया मेगापोलिस सोसायटीतील एका फ्लॅटमध्‍ये मित्रांसोबत अभिषेक राहत होता. 
- अभिषेकने आत्‍महत्‍या केली तेव्‍हा त्‍याचे तीन मित्र फ्लॅटमधील दुसऱ्या खोलीत गप्‍पा मारत बसले होते. 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक मूळचा कानपूरचा आहे. 8-9 महिन्‍यांपूर्वी त्‍याने टीसीएस जॉईन केले होते.  
- अभिषेकच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्द्याप कळू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 
मित्रांना पाठ‍वला सेल्‍फी 
- अभिषेकच्‍या एका मित्राने त्‍याच्‍या रुममेट्सना फोन करुन सेल्‍फीबद्दल सांगितले. 
- यानंतर एका खिडकीमधून अभिषेकचे रुममेट्स त्‍याच्‍या खोलीमध्‍ये शिरले. 
- तेव्‍हा त्‍यांना अभिषेक पंख्‍याला लटकलेला आढळला. 
- त्‍यांनी तातडीने अभिषेकला उपचारासाठी रुग्‍णालयात हलवले. डॉक्‍टरांनी तपासून त्‍याला मृत घोषित केले. 
- पोलिसांना घटनास्‍थळावरुन सुसाइड नोट किंवा इतर कोणताही पुरावा सापडला नाही. 
- पोलिस सध्‍या त्‍याचे मित्र ऑफीसमधील सहकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...