आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चहावाला’ सीए अपघातात जखमी; मणक्याला गंभीर दुखापत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य सरकारच्या ‘कमवा अाणि शिका’ याेजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला साेमनाथ गिराम हा एका अपघातात गंभीर जखमी झाला अाहे. पुण्यात चहाची गाडी चालवून सीए झाल्याने साेमनाथचे राज्यभर काैतुक झाले हाेते. साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सांगवी गावातून पुण्यात सीएचे शिक्षण घेण्यासाठी साेमनाथ गिराम हा तरुण अाला हाेता.

घरची अार्थिक परिस्थितीत बेताचीच असल्याने त्याने पुण्यात येऊन चहाची टपरी चालू केली सीएचे शिक्षण पूर्ण केले. गुरुवारी सायंकाळी टेंभुर्णीवरून ताे अकलूजकडे कारने जात असताना एका गाडीला अाेव्हरटेक करत असताना कार पलटी हाेऊन ताे गंभीर जखमी झाला. त्यात साेमनाथच्या मानेच्या मणक्याला जबर मार लागल्याने त्याचा कमरेखालच्या भागाच्या संवेदना कमी झाल्या अाहेत. त्यामुळे त्यास पुढील उपचाराकरिता संचेती रुग्णालयात हलविण्यात अाले अाहे. त्याच्यावरील उपचारांसाठी माेठा खर्च होणार असल्याचे समजताच उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा, सोमनाथ गिरामचेे छायाचित्र...
बातम्या आणखी आहेत...