आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher And Election Issue News In Marathi, Pune

उत्तरपत्रिका तपासू की निवडणुकीची कामे करू? शिक्षकांनी केला सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्राधान्याने करायचे, की निवडणुकीची कामे करायची, असा यक्षप्रश्न हजारो शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली जाऊ नयेत, असे निवडणूक आयोगाला सांगूनही राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याची पत्रे पोहोचली आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले, की दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली जाऊ नयेत, अशी विनंती निवडणूक आयोगाला यापूर्वीच करण्यात आली आहे. सध्या तरी राज्यभर उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम मंडळाने आखलेल्या नियोजनानुसार सुरू झाले आहे. तसे वेळापत्रकही ठरवून दिले आहे.