आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वही न आणल्याने शिक्षकाकडून जबर मारहाण, पुण्यातील जोग शाळेतील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील जोग शाळेतील सहावीतील एका विद्यार्थिनीची गृहपाठाची वही विसरल्याने शिक्षकाने तिला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत मुलीच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत. संबंधित शिक्षकाविरोधात पुण्यातील शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संबंधित शिक्षकाने या मुलीसह इतर काही मुला-मुलींना गृहपाठाची वही न आणल्याने मारहाण केली. दरम्यान, या घटनेविरोधात मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित केले जाईल. तसेच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याध्यपाकांनी दिले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंदविण्याला आला असला तरी अद्याप शिक्षकाला अटक करण्यात आलेली नाही.