आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन युवकाने केला बलात्कार; पीडितेने वडिलांच्या मदतीने भरचौकात दिला मृत्यूदंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या अल्पवयीन मुलाची पीडित मुलीच्या पित्याने भरचौकात काेयत्याचे वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे गुरुवारी दुपारी घडली. अाराेपीने स्वत:च पाेलिसांना फाेन करून अापण हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणातील मृत संशयित अल्पवयीन असल्याने व अाराेपी पीडित मुलीचा पिता असल्यामुळे मुलीची ओळख पटू नये म्हणून त्याची नावे प्रसिद्ध केलेली नाहीत.

नातलग असलेली पीडित मुलगी व अल्पवयीन मुलगा गावात शेजारी राहत होते. १० एप्रिल रोजी हा मुलगा व त्याच्या चुलत भावाने शेजारी राहणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली हाेती. त्यावरून दाेघांवर इंदापूर पाेलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता. या गुन्ह्यात अाराेपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पुण्यातील बालन्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, न्यायालयाने साेडले असले तरी मी त्याला साेडणार नाही, अशी धमकी पीडित मुलीचा पिता आरोपी मुलाच्या कुटुंबीयांना देत होता. या भीतीपाेटी कुटुंबीयांनी त्या मुलास इंदापूरच्या वसतिगृहात ठेवले हाेते.

पीडितेनेही केले वार
परीक्षा संपल्यामुळे अल्पवयीन मुलगा गुरुवारी दुपारी ३ वाजता अाई- वडिलांकडे गावी अाला हाेता. ताे अाल्याचे शेजारीच राहणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांना कळाले. हा मुलगा घरात जाताच पीडित मुलगी व तिचे वडील धाेरदार काेयते घेऊन त्यांच्या घरात घुसले. अाराेपीची शाेधाशाेध सुरू केली. त्यांचा रुद्रावतार पाहून मुलाच्या अाई- वडिलांनी दोघांनाही राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने त्याच्या अाईच्या छातीवर वार केला तर बापाने मुलाच्या वडिलांच्या हातावर वार केला. दाेघेही जखमी अाहेत.

पाठलाग करून गाठलेच
पीडित मुलगी व तिच्या पित्याचा रुद्रावतार पाहून अल्पवयीन मुलगा जीव वाचवून जिवाच्या अाकांताने घराबाहेर पळाला.  मात्र मुलगी व तिच्या बापाने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. शिवाजी चाैकात त्याला गाठले व खाली पाडून त्याच्या गळ्यावर वार केले. यात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला.

पुढील स्लाइडवर वाचा... पीडितेच्या वडीलांनी केले पोलिसांना केला फोन

 
बातम्या आणखी आहेत...