आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरण: मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मृत अनिकेत साबळे)
पुणे- प्रेम करत असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याने अपमानित झालेल्या एका 17 वर्षांच्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अनिकेत रोहिदास साबळे असे मृत तरुणाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पाच जणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे.

अनिकेत याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मुलीच्या घरी कळल्यानंतर, 13 जुलै रोजी काळवाडी येथील माजी सरपंच बबन एकनाथ काकडे, सदानंद एकनाथ काकडे, दिलीप दगडू हांडे, भिकू किसन काकडे, सुनील पांडुरंग काकडे हे इनोव्हा गाडीत काळवाडी फाटा येथे आले. अनिकेत त्याचा मित्र शाहरुख दुचाकीवरून जात असताना, या पाच जणांनी त्यांना घरी नेऊन जबर मारहाण केली.

'आमच्या मुलीच्या मागे काय फिरतोस तिची छेड काढतोस?' असा दम देत त्याला इलेक्ट्रिक केबल हाताने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळपासून अनिकेत बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी दिवसभर शोध घेतल्यानंतरही तो सापडल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. पिंपळवंडी परिसरातील एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूड भावनेने बघण्याच्या कारणावरून एकाचा खून-

खुन्नसने बघण्याच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना चिंचवड येथील आनंदनगर वसाहतीत घडली. विकी शिवाजी गायकवाड (23) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजू ऊर्फ रंग्या भीमा फुले राजू सिद्राम म्हेत्रे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी विकीला मारहाण करून ढकलून दिल्याने पेव्हिंग ब्लॉकवर डोके आपटून त्याचा खून केला.
बातम्या आणखी आहेत...