आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tempature News In Marathi, Marathwada Vidarbh, Divya Marathi

मराठवाडा-विदर्भ तापला, औरंगाबाद 37 तर बीड 38 अंशावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राजकीय वातावरणाप्रमाणेच तापमानाचा पाराही चढू लागला आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपर्यंत पोहोचला आहे. राज्यात भिरा येथे सर्वाधिक 42.5 अंश सेल्सियस नोंदवले गेले, तर औरंगाबाद 37.4 आणि बीडचा पारा 38.7 अंशांपर्यंत पोहोचला.


मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांत कमाल तापमानात वाढ झाल्याचे निरीक्षण वेधशाळेने नोंदवले आहे. विशेषत: जळगाव, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आदी ठिकाणी तापमानाने चाळिशी गाठली आहे. उर्वरित ठिकाणीही किमान तापमान 35 ते 38 अंशांच्या घरात आहे.


पुण्यात मात्र सलग गेले तीन दिवस राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी 17.2, शनिवारी 17.8 आणि रविवारी 18.2 असे किमान तापमान पुण्यात नोंदवण्यात आले असून त्यामुळे पुणे राज्यात कूल ठरले आहे.


शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी : गेल्या महिन्यात मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. त्यामुळे काही दिवस तापमान वाढणार नाही, असे चित्र होते. मात्र, आठ दिवसांपासून राज्यातील तापमान चांगलेच वाढू लागले आहे. उन्हामुळे टोप्या, स्कार्फ आणि शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे.


चोवीस तासांतील तापमान
अकोला 40.5
सोलापूर 40.1
वर्धा 40.0
नागपूर 39.8
मालेगाव 39.7
जळगाव 39.6
अमरावती 39.4
परभणी 39.5
गोंदिया 39.3
सांगली 39.2
सातारा 39.1,
नगर 38.7
कोल्हापूर 38.5
उस्मानाबाद 38.5
वाशीम 38.4
यवतमाळ 38.4
बीड 38.0
पुणे 37.9
औरंगाबाद 37.4
नाशिक 37.3
बुलडाणा 36.5
चंद्रपूर 35.8
रत्नागिरी 33.9
महाबळेश्वर 33.1