आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान वाढले तरीही राज्यात बीड थंडच,येत्या 24 तासांत हवामान कोरडे राहण्याची चिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रविवारच्या तुलनेत सोमवारी राज्याच्या तापमानात अंशत: वाढ झाली असली तरी सलग दुसर्‍या दिवशीही बीडमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदले गेले. या शहरातील पारा 10.2 अंश सेल्सियसपर्यंत उतरला होता.
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, विदर्भाच्या काही भागातील तापमानात वाढ झाली. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील थंडीही कमी झाली असून तापमान वाढले आहे. खान्देश व मराठवाड्यातील तापमानात तुलनेने लक्षणीय बदल झालेला नाही. दरम्यान, येत्या 24 तासांत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून किमान तापमान तेरा ते पंधरा अंशांच्या आसपास राहील. राज्यात पावसाची शक्यता नाही.
गेल्या 24 तासांतील किमान तापमान : रत्नागिरी - 24.5, पुणे - 16, नगर - 14.9, जळगाव - 13.2, महाबळेश्वर - 15.6, मालेगाव - 13, नाशिक - 14.3, सोलापूर - 17.8, उस्मानाबाद - 12.9, औरंगाबाद - 15.4, परभणी - 14.1, नांदेड - 14.6, अकोला - 16.2, अमरावती - 12, नागपूर - 13.8, वाशीम - 17 अंश.