जळगाव- महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून जळगावकरांना एप्रिलमध्येच 'मे हीट'चा तडाखा बसू लागला अाहे. काल (गुरुवारी) यावर्षीतील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात अाली. सकाळी 10 वाजेपासून 38 अंशापासून पुढे वाटचाल करणारा पारा वाजेनंतर 46 अंशावर पाेहचला हाेता. सायंकाळी 4 वाजेपर्यंत तापमान 46 अंशावर हाेते. 12 राेजी 41 अंशावर असलेले तापमान 13 राेजी अचानक 46 अंशावर गेल्याने त्याचा जनजीवन, बाजारपेठेवर परिणाम दिसून अाला.
उन्ह्याळ्यातील उच्चांकी तापमानामुळे परिचित असलेल्या जळगावच्या तापमानाकडे दरवर्षी राज्यभराची नजर असते. गेल्या दाेन वर्षात तापमान काहीसे 40.42 अंशापर्यंत स्थिरावले हाेते. यावर्षी मात्र पुन्हा तापमानाची उच्चांकी वाटचाल सुरू झाली अाहे. गेल्या पंधरवड्यात तापमान 44 अंशापुढे गेल्यानंतर काहीसे खाली अाले हाेते. गुरुवारी तापमानात तब्बल पाच अंशाने वाढ झाली. तापमान 46 अंशावर, अार्द्रता 11 टक्के असताना हवेचा वेगही मंदावल्यामुळे उकाडा वाढला हाेता. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या अॅक्युवेदर या खासगी संकेतस्थळावर जळगाव शहरात दुपारी ते वाजेपर्यंत 46 अंश सेल्सिअस तापमान असल्याची नाेंद करण्यात अाली.
तर शासकीय हवामान अभ्यास केंद्र असलेल्या ममुराबाद येथील तापमापक केंद्रावर जळगाव शहरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात अाली. अचानक वाढलेल्या तापमानामुळे दुपारी शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसत हाेता.
रस्त्यांवर परिणाम
दुपारीते वाजेदरम्यान रस्त्यावरील गर्दी काहीशी अाेसरली हाेती. उन्हाचा चटका असह्य झाल्यामुळे नागरिक सावलीच्या शाेधात हाेते. रस्त्यावरची वर्दळ दुपारच्या वेळेत कमी झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत वातावरण उष्ण हाेते.
लग्नसराईमुळे गर्दी
लग्नसराईमुळे गुरुवारी बाजारपेठेत कपडे, साेने खरेदी करण्यासाठी अालेल्या बाहेरगावच्या ग्राहकांची गर्दी हाेती. मात्र, तापमान अचानक वाढल्यामुळे बाहेरगावाहून लग्नाच्या खरेदीसाठी अालेले लाेक सावलीचा शाेध घेत हाेते. कपडे, साेन्याच्या दुकानांमध्ये एसीची थंड हवा अाणि बाहेर अाल्यानंतर ४६ अंश सेल्सिअस तापमानाचा फटका, यामुळे अनेक ग्राहक बाहेरच अाडाेशाचा शाेध घेत हाेते. तापमान उच्चांकी असले तरी लग्नसराईची धूम मात्र कायम हाेती.