आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो- ऑटोची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- टेम्पो- ऑटोची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. ही घटना पुण्याजवळील रहाटणी परिसरातील जगताप डेअरीजवळ बुधवारी पहाटे घडली. केतन कुंडलिक सराेदे (रा. रहाटणी, पुणे), संदीप महादेव घाेडके (रा. थेरगाव, पुणे), विजय अंबादास कसबे (रा. काळेवाडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. पहाटे तीनच्या सुमारास दाेन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाल्याचे पाेलिस दलातील सूत्रांनी सांगितले.