आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Class Examination Declare Tomorrow On Website

दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य शिक्षण मंडळाने मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (८ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी ही माहिती दिली.

मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व या माहितीची प्रिंट घेता येईल.
मंडळाची संकेतस्थळे -
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams
एसएमएसवरही निकाल -
एसएमएस करून मोबाइलवरही निकाल मिळेल. त्यासाठी..
MH10 आसन क्रमांक टाइप करून ५८८८८१११ वर पाठवावा.