आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Olympid Start: Science Olympide Inaugarated In Pune

दहावी ऑलिम्पियाड सुरू;‘सायन्स ऑलिम्पियाड’चे पुण्यात दिमाखात झाले उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, हंगेरी, रुमानिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, कंबोडिया, श्रीलंका आदी जगभरातील 42 देशांमधून आलेल्या बालवैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणा-या दहाव्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडचे उद्घाटन बुधवारी पुण्यात मोठ्या उत्साही वातावरणात झाले. देशोदेशीच्या बालवैज्ञानिकांनी या वेळी स्वत:चे राष्ट्रध्वज फडकावत स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सांगितले. पुढचे सहा दिवस दोनशे आंतरराष्ट्रीय बालवैज्ञानिक सुवर्ण, रजत आणि कांस्यपदके जिंकण्यासाठी बुद्धी पणाला लावतील.
भारतात प्रथमच आयोजित ऑलम्पियाडचे उद््घाटन पद्मभूषण डॉ. अनिक काकोडकर यांनी केले. ‘‘समाजापुढच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. त्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक प्रगती गरजेची आहे. परंतु, ही प्रगती मानवी दृष्टीकोनातूनच साधावी लागेल. इथे जमलेल्या उद्याच्या शास्त्रज्ञांनी फक्त स्वत:च्या देशाचा नव्हे तर विश्वाचे हित डोळ्यापुढे ठेवून वैज्ञानिक विकास कराल,’’ अशी अपेक्षा डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली. या सायन्स ऑलम्पियाडमध्ये मिळणारी पदके तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी अमूल्य खजिना असतील. देशोदेशीच्या बालवैज्ञानिकांबरोबर संवाद साधण्याच्या संधीचाही तुम्ही लाभा घ्या. बालवैज्ञानिकांना वैज्ञानिक जाणीवा वाढवत असतानाच एकमेकांची संस्कृती जाणून घेता येईल. संशोधनाच्या भावी कारकिर्दीत याचा उपयोग होईल, असे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक प्रा. मुस्तानसिर बरमा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलम्पियाडचे सचिव प्रा. चँग, समन्वयक डॉ. परेश जोशी, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या संचालक जयश्री रामदास, विज्ञान ऑलम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. विजय सिंह यावेळी उपस्थित होते.
2010 मधल्या सायन्स ऑलम्पियाडमध्ये भारतीय संघाने 4 सुवर्ण आणि 2 रजत पदके जिंकून सर्वोच्च कामगिरी केली होती. यावेळचा संघ ही कामगिरी मागे टाकतो का, याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
‘चीन-रशियाचे आव्हान वाटते’
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे यजमानपद भारताकडे असल्याने बारा विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळाली आहे. आर. एस. हर्षवर्धन, जी. साई. तेजा, कुंडुमल्ली अश्विनी रेड्डी, कोंडापल्ली अनिरुद्ध रेड्डी, बुरे नायडू आणि बेडापुडी वामसी हे सहाही विद्यार्थी हैद्राबाद (आंध्र प्रदेश) मधल्या एकाच शिक्षण संस्थेतून आले आहेत हे विशेष.