आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सिमेंट काँक्रीटच्या जंगलात बहरली हिरवीगार गच्ची!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात डेक्कनसारखा प्रचंड वाहतुकीने गजबजलेला परिसर... काँक्रीटच्या गगनचुंबी इमारतींचे जाळे... वाहनांचे आवाज, प्रदूषण...पण इथेच एका इमारतीच्या गच्चीवर एक हिरवेगार नंदनवन भिडे दांपत्याने निर्माण केले आहे. सौरऊर्जेचा वापर करून, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत प्रिया आणि सुनील भिडे यांनी ते राहत असलेली ‘२१, हार्मनी’ ही इमारत म्हणजे वाळवंटातलं ओअॅसिस केली आहे.

सुनील हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट तर प्रिया या फिजिओथेरपिस्ट. पण हिरवाईची स्वप्नं पाहणारी त्यांची नजर इमारतीला बाग नसल्याने गच्चीकडे वळली आणि ओला-कोरडा कचरा कल्पकतेने वापरून त्यांनी अपार मेहनत, अभ्यास आणि नियोजनपूर्वक काम या त्रिसूत्रीवर आधारित आपल्या गच्चीवरच हिरवाईचे स्वप्न साकार केले आहे.

भिडे यांनी गच्चीवरच्या बागेत पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचे उत्पादन घेतले अाहे. कोथिंबीर, आले, लसणाचेही उत्पादन एका वाफ्यात घेतले जाते.

पाण्याचा फेरवापर, ग्रीन कूलर बसवून मत्स्यपालनही
>उपयुक्ततेला सौंदर्यदृष्टीआणि कल्पकता यांची जोड देत गच्चीवरची हिरवाई फुलली आहे. सध्या उन्हाळा असल्याने ओलावा टिकेल इतकेच पाणी वापरले जाते. आमच्या झाडांवर आता पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. पक्ष्यांच्या किमान चार पिढ्या आमच्या बागेत घर बनवून गेल्या आहेत. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला आहे. ग्रीन कूलर बसवून त्यात मासे सोडले आहेत. मुख्य म्हणजे इतरांनाही असे करण्याचा सल्ला आम्ही देतो.
- सुनील प्रिया भिडे, पुणे.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रिया व सुनिल भिडे यांनी असे केले हिरवे स्वप्न साकार

बातम्या आणखी आहेत...