आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Text Books Translation Right To Private Publisher, State Education Board

पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराची परवानगी खासगी प्रकाशकांना, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शैक्षणिक वर्ष 2012-13 आणि 2013-14 पासून इयत्ता नववी ते बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत भाषेतर विषयांची इंग्रजी व मराठी माध्यम सोडून उर्वरित माध्यमाची पाठ्यपुस्तके भाषांतर करण्याची परवानगी जाहीररीत्या खासगी प्रकाशकांना देण्यात येत असल्याचे मंगळवारी राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले.


राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी पाठ्यपुस्तके भाषांतर करताना मंडळाची मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तके प्रमाणित मानून भाषांतर केले जावे. तसेच सदर भाषांतराची व ती तपासून घेण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित प्रकाशकाची राहील. याबाबत मंडळ स्तरावर कार्यवाही होणार नाही, मंडळाकडून त्याला मान्यता वा शिफारस देण्यात येणार नाही. खासगी प्रकाशकाकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. त्यामुळे मजकुराच्या दर्जेदार भाषांतराची जबाबदारी सर्वस्वी प्रकाशकाची राहील, असे मंडळाने स्पष्ट केले.


दुरुपयोग करू नका
भूगोल व इतर विषयांत जेथे नकाशांचा समावेश असेल, त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया, डेहराडून यांची मान्यता अनिवार्य राहील. मूळ पाठ्यपुस्तकातील चित्राकृती, आलेख यांच्या चुकीच्या छपाईस मंडळ जबाबदार नसेल. मजकुराचा दुरुपयोग होणार नाही, अशीही अट असेल.
के. के. पाटील, सचिव, शिक्षण मंडळ