आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळलेल्या धनश्रीची झुंज अपयशी, धाेंड्याच्या वाणासाठी सासरच्यांनी जाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ बारामती- धाेंड्याच्या महिन्याचे वाण म्हणून सुनेच्या माहेराहून साेनसाखळी, अंगठी, ब्रेसलेट व सासऱ्यास पाेशाखाचा मान मिळत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी एका विवाहितेस जाळले हाेते. दाैंड तालुक्यातील वरवंड येथे घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेली धनश्री राेहन दिवेकर (२५) हिच्यावर ११ दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मात्र, गुरुवारी तिची प्राणज्याेत मालवली.

उपचार सुरू असताना धनश्री हिने पाेलिसांना जबाब दिला हाेता. त्यानुसार तिचा पती राेहन रावसाहेब दिवेकर, सासू अरुणा रावसाहेब दिवेकर यांना अटक करण्यात अाली, तर यात फरार झालेला तिचा सासरा रावसाहेब नामदेव दिवेकर यालाही नंतरच्या काळात पाेलिसांनी अटक केली. सदर तिघांच्या विराेधात यवत पाेलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. धनश्री व राेहन यांचा विवाह बारामती येथे ३ जून २०१३ राेजी झाला हाेता. त्यानंतर काही महिन्यांतच तिचा सासरच्या व्यक्तींनी पैशासाठी छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिक महिन्यात दागिने व पाेशाख मिळावा यासाठी धनश्रीच्या मागे तगादा लावण्यात अाला. त्यावरून वाद झाल्यानंतर सासरच्या व्यक्तींनी तीन जुलै राेजी पहाटे तिच्या अंगावर राॅकेल अाेतून तिला पेटवून दिले हाेते.