आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात पहिल्या जातपंचायत खटल्यातील अाराेपी निर्दाेष; 2013 मध्‍ये घडले होते प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यातील पहिला जातपंचायत खटला मानल्या जाणाऱ्या ‘श्री गाैड ब्राह्मण’ जातपंचायतीशी संबंधित सर्व आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दाेष मुक्तता केली.

 

२०१३ मधील हे प्रकरण आहे. श्री गौड ब्राह्मण समाजातील संताेष सुखलाल शर्मा (शुक्रवार पेठ, पुणे) यांनी नागपूरच्या दुर्गा गाेपाळ जाेशी या युवतीशी लग्न केले होते. या प्रकरणाची शर्मांनी बिबवेवाडी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीनुसार, ब्राह्मण जातीतील मुलीशी विवाह केल्याच्या कारणावरून जातपंचायतीने वाळीत टाकले. समाजातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास हजर राहिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. शिवाय समाजात परत घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती. जातपंचायतीचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण मानले जाते. पोलिसांनी जातपंचायतीतील पंच नेमाराम चांदमल बाेलद्रा (४८, बिबवेवाडी), भरतलालजी रूपचंदजी धर्मावत (६६, काेंढवा), देवाराम मंगनीराम धर्मावत (६४, मार्केट यार्ड), गाेविंद पाेपटलाल डांगी (५८, पर्वती दर्शन), भवरलाल माेहनलाल मावाणी (५८, दत्तवाडी), भवरलाल काणीराम धर्मावत (५५, काेथरूड), गाेविंद लक्ष्मण धर्मावत (५९, सिंहगड राेड) व रामलाल कन्हैयालाल डांगी (५५, बिबवेवाडी) यांना अटक करून गुन्हा दाखल केला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून ८ साक्षीदारांच्या साक्षी नाेंदवण्यात अाल्या. बेकायदेशीर जातपंचायत चालवल्याचा कोणताही पुरावा सिद्ध न झाल्याने न्यायालयाने अाराेपींची निर्दाेष मुक्तता केली.

बातम्या आणखी आहेत...