आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दी बर्निंग बस...एसटी चालकाच्या प्रसंगवधानाने थोडक्यात बचावले तेरा प्रवाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव बसने अचानक पेट घेतला. मात्र, ही बाब चालकाच्या लक्षात येताच मोठा अनर्थ टळला. त्याने सर्व प्रवाशांना प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 13 प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आडोशी गावाजवळ ही घटना घडली. दादरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात आली. त्याने बस रस्त्याच्या बाजुला थांबवली. तेव्हा सर्व प्रवाशी गाढ झोपेत होते. त्याने सर्व प्रवाशांना उठवले आणि त्यांना त्यातडीने खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि देवदूत दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी दोन तास शर्थीचे पर्यंत करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे.

पेटत्या एसटी बसचा व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...