आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील महिलेवर सोलापूरात सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडिओही बनविला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हडपसर येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा पुण्याच्या बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या पतीसोबत सोलापूरला गेली होती. तेव्हा तिथे पाच जणांनी बंदूकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि पैशांवर डल्ला मारला. त्यानंतर निर्जन भागात नेऊन महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्या नराधमांनी महिलेची छायाचित्रेही घेतली आणि नग्नावस्थेत पाण्यात पोहण्यास सांगून अश्लिल व्हिडिओही तयार केला.