आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलर्सवर चाेरट्यांचा हल्ला; पिस्तुलचा धाक दाखवुन दुकान लुटण्याचा प्रयत्न, एकजण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - पुणे- अहमदनगर रस्त्यावरील वाघाेली येथील बगाडे ज्वेलर्स या दुकानात मंगळवारी दुपारी दाेन अनाेळखी सशस्त्र चाेरटयांनी शिरुन पिस्तुलचा धाक दाखवुन दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानातील महिला कर्मचारीने सायरन सुरु करताच, चाेरटे पळुन जावू लागले. यावेळी चाेरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चाेरटयांनी गाेळीबार केल्याची घटना घडली असुन त्यात एक इसम जखमी झाला अाहे.

वाघाेली पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाेली येथील बगाडे ज्वेलर्स मध्ये दाेन अज्ञात इसम पिस्टल घेवुन दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवुन दुकानातील सर्व माल देण्यास सांगितले. तेवढयात महिला कर्मचारीने सायरन सुरु करताच चाेरटे हाती लागेल 
तेवडे साेन्याचे दागिने घेवून पळू लागले. 

त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न दुकानातील एका कर्मचाऱ्याने करताच, चाेरटयांनी त्याच्या दिशेेने गाेळीबार करत माेटारसायकलवर चाेरटे पसार झाले. या घटनेत दुकानातील कर्मचारी जखमी झाला असुन दाेन्ही चाेरटयांचे सीसीटीव्ही फुटेज पाेलीसांना मिळून अाले अाहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, पाेलिसांकडून ९१ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना प्रदान...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...