आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड किलाे साेने, २० दुचाकी उच्चशिक्षित चोराकडून जप्त; चाेरीचे ५१ गुन्हे उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एका उच्चशिक्षित चोराकडून पुणे पोलिसांनी तब्बल दीड किलो सोने, २० दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. गिरीश नायक असे या चोरट्याचे नाव असून त्याने साेनसाखळी चाेरीचे केलेले ५१ गुन्हे कबूल केले आहेत. त्याच्या ताब्यातून ४२ लाखांचे १६८२ ग्रॅम साेने, २० दुचाकी व एक चारचाकी असा एकूण ५५ लाख ४७ हजार रुपयांचा एेवज हस्तगत करण्यात अाला अाहे.

२९ जुलै राेजी एक इसम चाेरीची दुचाकी घेऊन लुल्लानगर परिसरात िफरत असल्याची माहिती काेंढवा पाेलिसांना िमळाली हाेती. त्यानुसार, सापळा रचून गिरीशला पकडण्यात अाले. त्याने विजयन शिवनकुमारच्या मदतीने अनेक वाहने चोरून विकल्याची कबूली दिली. दरम्यान, मागील पाच वर्षांत घडलेल्या १२८ साखळीचाेरीच्या गुन्ह्यांपैकी तब्बल ५१ गुन्ह्यांत गिरीशचा सहभाग आहे.

४५ लाखांची कमाई
गिरीश नायक हा पदवीधर असून व्यवसायाने मेकॅनिक अाहे. पुण्यातील एका उच्चभ्रू साेसायटीत पत्नी व मुलांसाेबत राहतो. त्याने काही िदवस काॅल सेंटरमध्ये नाेकरी केली होती. उच्च राहणीमान तसेच इंग्रजीसह अन्य भाषांतील प्रभावशाली संभाषण कौशल्यामुळे त्याच्यावर काेणीही संशय घेत नसे. महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत तो सोनसाखळी लंपास करायचा. हे साेने ताे ताे पुण्यातील नामांकित सराफ पेढीत विकत असे. यातून आलेली रक्कम बचत खात्यात जमा करत असे. मागील चार वर्षांत त्याने या माध्यमातून सुमारे ४५ लाख रुपये जमवले. हा पैसा त्याने ऐशोआराम तसेच दुसऱ्या पत्नीच्या मर्जीसाठी खर्च केल्याचे समाेर अाले अाहे.