आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theft At World Of Titan Showroom , Camp, 57 Lac Loot

पुण्यातील MG रोडवरील टायटन शोरूममधून 57 लाखांच्या घडाळ्यांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील गजबजलेल्या महात्मा गांधी (एमजी) रोडवरील वर्ल्ड ऑफ टायटनच्या शोरूममधून अज्ञात चोरट्यांनी 57 लाख रुपयांची घड्याळ चोरून नेल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच चोरट्यांनी शोरूमचे कुलुप तोडून शोरूममधील 1 लाखभर रूपये रोख, 46 लाख रुपयांची 40 सोन्याची घड्याळे तर एक 10 लाख किंमतीचे मनगटी घड्याळ असा एकून 57 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही चादर गॅंग म्हणून ओळखली जाते. मात्र चोरट्यांची चेहरे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.