आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही ध्वनिक्षेपक मिळणार नाही; साउंड असोसिएशनचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उत्सव काळात पोलिसांकडून लाऊडस्पीकर्सवाल्यांची होणारी कुचंबणा, मारहाण, क्षुल्लक कारणांवरून येणारी जप्ती आणि कारवाई याविरोधात  राज्यभरातील लाऊडस्पीकर्स व्यावसायिकांनी शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. ध्वनिप्रदूषण मापनाबाबतही  आमचे आक्षेप आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या  कार्यक्रमालाही लाऊडस्पीकर मिळणार नाही, असा इशाराही संघटनेने  दिला आहे.

साउंड, लाइट अँड जनरेटर्स असोसिएशनची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष उदय शहा आणि  पदाधिकारी सचिन नाईक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र या उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी डीजेचालकांना पोलिसांकडून मारहाण केली जाते, महागडी ध्वनिक्षेपक व्यवस्था जप्त केली जाते, अनेकदा त्यातील नाजूक पार्टचे नुकसान होते, अनेकदा संपूर्ण साउंड सिस्टिम जप्त केली जाते. डीजेचालकांचा छळ केला जातो याविरोधात  एकत्रित आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...