आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर अवघ्या 36 तासात पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट होईल- भानुप्रताप बर्गे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याख्यानमालेत बोलताना भानुप्रताप बर्गे... - Divya Marathi
व्याख्यानमालेत बोलताना भानुप्रताप बर्गे...
पुणे- पाकिस्तान वारंवार दहशतवाद्या कारवाया करून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारताने ठरविल्यास अवघ्या 36 तासात पाकिस्तानचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून नष्ट होईल असा विश्वास दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केला.
अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव आणि संदीप वाघेरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प भानुप्रताप बर्गे यांनी गुंफले. बर्गे यांनी 'देशातील वाढता दहशतवाद' या विषयावर व्याख्यान दिले.
बर्गे म्हणाले, भारतावर गेल्या 5 वर्षात दीडशेपेक्षा अधिक दहशतवादी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 800 हुन अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. या प्रत्येक दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगासमोर स्पष्ट झाले आहे. भारत हा लोकशाही तत्वावर चालणारा देश असल्याचा गैरफायदा पाकिस्तान घेत आहे. मात्र जर भारताने ठरवलं तर अवघ्या 36 तासांमध्ये जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव नष्ट होईल असा विश्वास बर्गे यांनी व्यक्त केला.
दहशतवाद भारताला नवीन नाही. बाबरच्या शासन काळापासून भारतामध्ये दहशतवादाचे आगमन झाले. मंदिरे उध्वस्त करणे, महिलांची अब्रु लुटणे या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून त्याने धुमाकुळ माजवला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने हा मुघली दहशतवाद तेव्हा मुळापासून नष्ट केला होता. आजही देशातील दहशतवाद नष्ट करायचा असेल तर समाजातील प्रत्येकालाच शिवमंत्र आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...