पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या आरोपीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. 4 अल्पवयीन मुलांचा वाहनचोरीत समावेश आहे. तब्बल 18 लाख रुपयांचा ऐवज या सर्वांकडून जप्त करण्यात आला आहे. 12 दुचाकी आणि 41 तोळे सोन्यासह 55 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
घरफोडी करणारा आरोपी पिंपरीमध्ये आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्र्वर मेरूरकर यास पिंपरीमधील वैभवनगर येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तब्बल 16 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यात 412 ग्रॅम सोने, 400 ग्रॅम चांदी, 4 लॅपटॉप, 2 कॅमेरे असा एकूण 13 लाख 91 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत एका सराईत इराणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तालिब रफिक बेग असे या इराणी आरोपीचे नाव असून तो फसवणूक आणि गाड्यांच्या काचा फोडून चोरी करायचा. त्याच्याकडून रोख रक्कम 55 हजार 750 रुपये मिळाले आहेत. तसेच 3 गुन्हे उघडकीस आले आहेत.
तिसऱ्या घटनेत दुचाकी चोरणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता 12 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्याचे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा 3 लाख 27 हजार 250 रुपयांच्या दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पिंपरीचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, उमेश वानखेडे, संतोष भालेराव आदींनी केली.