आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी मारला आईस्क्रीमवर डल्ला; एका रात्रीत पुण्यातील निगडी परिसरात 6 दुकाने फोडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- एकाच दिवसात दोन चोरीच्या घटना पिंपरी चिंचवड शहरात घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये माजी राष्ट्रपती  नातेवाईकांच्या घरी चोरी झाली आहे. त्यामध्ये जवळपास 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. मात्र, दुसऱ्या घटनेत काहीच मिळाले नाही म्हणून चोरट्यांनी चक्क आईस्क्रीमवर डल्ला मारला आहे. ‍इतकेच नाही तर दोन लिटर आईस्क्रीम घेऊन ते पसार झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात चोरीचे सत्र सुरूच असून शुक्रवारी पहाटे रात्री दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटे पाचच्या सुमारास पूर्णानगर परिसरातील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. या परिसरात लेडीज शॉपी, माल ट्रान्सफरचे दुकान, आईस्क्रीम पार्लर अशी दुकाने आहेत. या चोरीमध्ये चोरट्यांना जास्त काही हाती लागले नसून चोरांनी दुकानातून थोडेफार पैसे आणि आईस्क्रीमवरच ताव मारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी दुचाकीवरून येऊन पूर्णा नगर परिसरातील चार ते पाच दुकाने फोडली. मात्र, यामध्ये चोरट्याना काही ज्यास्त हाती लागले नसून चोरटयांनी दुकानाचे शेटर उचकटून चक्क आईस्क्रिमची चोरी केली आहे. चोरी केल्यानंतर अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. निगडी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, यापूर्वी नववर्षाच्या सुरुवातीला या परिसरात चोरीची घटना घडली होती.

पुढील स्लाइवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो
बातम्या आणखी आहेत...