आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा चोर पुण्यात अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - बाणेर परिसरात पायी जात असलेल्या महिलेला मारहाण करुन तिच्याकडील सोन्याची साखळी चोरणारा औरंगाबादचा रामचंद्र रावसाहेब पिंपळे (वय 24, रा. चिकलठाणा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा एक साथीदार चोरीचा 21 हजाराचा ऐवज घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी कुसुम फेडरीक बायजेस यांनी फिर्याद दाखल केली आहे. बायजेस व त्यांची भाची प्रशा या बाणेर परिसरात पायी जात होत्या. त्या वेळी मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांना हेल्मेट व रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची साखळी, रोख पैसे व मोबाइल असा 21 हजार रुपयांचा माल चोरला. आरोपी पळून जात असताना नागरिकांनी पिंपळे या आरोपीस पकडले तर त्याचा साथीदार ऐवज घेऊन लंपास झाला.