आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी करायचा शेळ्यांची वाहतूक; आता या व्यवसायात कमावतोय कोट्यावधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजसजवळ अनेक लक्झरी वाहने आहेत. - Divya Marathi
तेजसजवळ अनेक लक्झरी वाहने आहेत.
पुणे- आज कुर्बानीचा सण म्हणजेच ईद-उल-अजहा (बकरी ईद) जगभरात साजरी केली जात आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला 10 वी पास असणाऱ्या एका अशा व्यक्तीची माहिती देत आहोत ज्याने शेळ्या विकुन कोट्यावधी रुपये कमावलेत. बकरी ईदच्या 2 दिवसापूर्वी त्याने एका बकऱ्याची विक्री 1 लाखाला केली आहे.

कधीकाळी करायचा शेळ्या वाहतूकीचे काम
- सांगलीतील बामणी गावात राहणारा तेजस लेंगरे 1999 मध्ये 10 वी उत्तीर्ण झाला. पुढे शिकण्याऐवजी काहीतरी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला.
- काही तरी मोठे काम करुन दाखवायचे अशी त्याची इच्छा होती. सुरुवातीला त्याने वाहतूकीचा व्यवसाय सुरू केले.
- जवळपास वर्षभर तो हाच व्यवसाय करत होता. त्यानंतर त्याने शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला.
 
व्यवसाय सुरु करण्यासाठी सुध्दा नव्हते पैसे
- तेजसजवळ व्यवसाय सुरु करण्यासाठी सुध्दा पैसे नव्हते. घरातील स्थितीही अशी नव्हती की ते त्याला एकरकमी 20-25 हजार रुपये देऊ शकतील.
- तेजसने काही पैसे उधारीवर घेतले आणि आफ्रिकन बोअर प्रजाती 2 शेळ्या खरेदी केल्या. त्याने घराजवळच महाकाली शेळीपालन केंद्र सुरु केले.
 
दरवर्षी 20-22 लाखाचा नफा 
- काही वर्षातच तेजसचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याला चांगला नफा होऊ लागला. आज तेजसजवळ 250 हून अधिक शेळ्या आहेत. 
- तो कोटयावधीची उलाढाल करत असून त्याला 20 ते 22 लाखाचा नफा दरवर्षी होतो.
- शेळ्याच्या लेंडयापासूनही त्याला काही लाख रुपये मिळतात. खत म्हणुन तो त्याची विक्री करतो.

शेळ्यांची अशी ठेवली जाते बडदास्त
- शेळ्यांना 3 वेळा कडबा दिला जातो. वजन वाढविण्यासाठी पाण्यात मिसळून प्रोटीन पावडर देण्यात येते.
- विविध आजारांपासून रक्षण करण्यासाठी त्यांची दर 21 दिवसांनी तपासणी करुन त्यांना आवश्यक ती औषधे आणि इंजेक्शन देण्यात येते. स्वच्छतेबाबतही काळजी घेतली जाते.

एक लाखात विकला जातो एक बकरा
- तेजसजवळ आफ्रिकन बोअर जातीचे बोकड आहेत. त्यांचे वजन 120 ते 150 किलो असते.
- ईदच्या काळात त्याची विक्री 70 हजारापासून 1 लाखाला केली जाते.

बकरा खरेदी करण्यासाठी वेटिंग
- शेळ्या विक्री करण्यासाठी तेजसला मार्केटची गरज पडली नाही. व्यापारी आणि शेळ्या खरेदी करणारे त्याच्या शेळीपालन केंद्रावर येतात आणि माल खरेदी करतात.
- अनेकांना ग्राहकांना महिनाभर प्रतिक्षाही करावी लागते.
 
पुढील स्लाईडवर पाहा तेजसच्या शेळीपालन व्यवसायाचे आणखी काही फोटो
बातम्या आणखी आहेत...