आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Threats Calls From Unknown For Dr. Sadanand More

फॅसिस्टवादावर भाष्य केल्याने इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांना धमक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील इतिहास संशोधक व समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांना अज्ञातांकडून फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार त्यांनी केली. एका वृत्तवाहिनीवर त्यांनी पोलादी सत्य या कार्यक्रमात सरदार वल्लबभाई पटेल यांच्याबद्दलची खरी माहिती सांगितली होती. तसेच नरेंद्र मोदीं आणि फॅसिस्टवाद याबाबत जाहीर भाष्य केले होते. याचबरोबर मोरे यांनी लता मंगेशकर यांच्यापासून ते सध्याची राजकीय स्थिती, 2014 च्या सार्वत्रिक निवडणूका आणि देशात जर मोदी म्हणजे फॅसिस्ट विचाराचे सरकार आले तर देशापुढे व समाजापुढे मोठा धोका असल्याचे मत व्यक्त केले होते. या कार्यक्रमानंतर मोरे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने मोरे यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या धमक्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला या शोभणा-या गोष्टी नाहीत. दाभोलकरांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर तर बाब फारच गंभीर आहे. मात्र, यामागे कोणत्या शक्तीचा हात असणार आहे ते उघड आहे. मात्र अशा शक्तीच्या मूळापर्यंत जाण्याची गरज असल्याचे मत आव्हाड यांनी म्हटले आहे.