आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुशंकेच्या बहाण्याने तीन अाराेपींचे पलायन; येरवडा कारागृहात नेताना घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सातारा जिल्ह्यातील खंडाळा पारगाव न्यायालयात एका प्रकरणात पुण्यातील येरवडा कारागृहातून तीन अाराेपींना हजर करण्यात अाले हाेते. मात्र, खंडाळ्याहून पुण्याला परत येताना तिघांनी लघुशंकेचा बहाणाकरून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. 

संताेष मच्छिंद्र जगताप, संताेष चिंतामणी चांदीलकर आणि राजू महादेव पाथारे (सर्व. रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. अार्म अॅक्टच्या एका गुन्ह्यात पाेलिसांनी तिन्ही अाराेपींना साेमवारी दुपारी खंडाळा येथील न्यायालयात हजर केले. 

न्यायालयाने सदर खटल्यात अाराेपींना २१ एप्रिल पुढील तारीख िदली. त्यामुळे आरोपींना घेऊन पोलिस पुन्हा  पुण्याकडे येत  होते. मात्र, कात्रज घाट उतरत असताना लघुशंकेला जाण्यासाठी तिघांनी गाडी थांबवली. त्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करून पलायन केले. आरोपींच्या शोधासाठी पथके करण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...