आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज विकणाऱ्या तिघांना अटक, ६० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अमली पदार्थांची (ड्रग्ज) विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. या वेळी त्यांच्या ताब्यातून ६० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

याप्रकरणी नोफर क्रिस्टीन (रा.नायजेरिया), सौरभ भवरीसास शर्मा व समीर अली शेख यांना अटक करण्यात आली आहे. भवानी पेठ परिसरात एक नायजेरियन तरुण मेफेड्रॉन नावाचे ड्रग्ज विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून नोफर क्रिस्टीन याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान सौरभ शर्मा व समीरची नावे समोर आल्याने दोघांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.