आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात हलक्या स्वरुपाचे तीन स्फोट; एक जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर बुधवारी रात्री 48 मिनिटांमध्ये चार स्फोट झाले. याशिवाय एका ठिकाणी स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. लागोपाठ झालेले सगळे स्फोट 7.27 ते 8.15 वाजेच्या दरम्यान झाले आहेत. आतापर्यंत जिवित हानीचे वृत्त नाही. फक्त एक जण जखमी झाला आहे.
स्‍फोटांमध्‍ये जखमी झालेल्‍या दयानंद पाटील यांना ससून रुग्‍णालयात नेण्‍यात आले. तिथे त्‍यांच्‍या विविध तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. पाटील यांच्‍याकडे एक संशयित म्‍हणूनही पाहण्‍यात येत आहे. त्‍यांची चौकशी करण्‍यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पाटील यांच्या बायकोला ताब्यात घेतले असून, तिच्याकडून दयानंदबाबत माहिती घेऊ चौकशी केली जात आहे. तसेच बालगंधर्व चौकात अण्णा हजारे यांच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या संघटनेच्या सुरु असलेल्या उपोषणाची जागा बदलावी, असे निर्देश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
पोलिस सध्या तरी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे म्हणत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी गृह मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली त्याच दिवशी हे स्फोट झाले आहेत हे विशेष. जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या देना बॅंक, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि गरवारे पूल येथे हे स्फोट झाले. स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. स्फोटांमध्ये पेन्सिलसेल आणि डिटोनेटरचा वापर करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरच ठेवलेली स्फोटके निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एनआयएचे पथक पुण्यामध्ये पोचले आहे. घटनास्थळी दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि बॉम्बनाशक पथक तपास करत आहे. मॅकडोनाल्ड आणि देना बँकेसमोरील सीसीटीव्ही कॅमे-यांचे व्हिडिओ फुटेज काढण्यात आले आहे.
अमोनियम नायट्रेटचा वापर
स्फोटात अमोनियम नायट्रेट, लहान डिटोनेटर्स, 9 व्होल्टच्या पेन्सिल सेलचा वापर करण्यात आला. स्फोट कमी तीव्रतेचे होते. प्रत्‍येक बॉम्‍बमध्‍ये द्रवरुप स्‍फोटके वापरली होती. प्रत्‍येक बॉम्‍बला टायमर लावण्‍यात आले होते. एकाच वेळी स्‍फोट घडविण्‍यात यावे, असा हेतू असावा. जो बॉम्‍ब निकामी करण्‍यात आला, त्‍याच्‍या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. जवळपास अर्धा किलो वजनाची स्‍फोटकांचा वापर करण्‍यात आला होता.
राज्य म्हणते, खोडसाळपणा; केंद्र म्हणते, हे कारस्थान
राज्याचे अतिरिक्त गृहसचिव अमिताभ राजन यांनी, स्फोट किरकोळ असून, यामागे खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. तर स्फोटांमागे कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात नसल्याचे मत पुण्‍याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले. लोकांमध्ये घबराट पसरविण्यासाठीच हे स्फोट करण्यात आले असावेत, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. केंद्रीय गृहसचिव आर.के. सिंग यांनी दहशतवादी हल्ल्याची शंका व्यक्त केली.
लागोपाठ घडलेल्या तीन घटना योगायोग की कारस्थान?
दोन वेळा ग्रीड ठप्प होणे : 30 जुलै रोजी नॉर्थ ग्रीड ठप्प. दुस-याच दिवशी तीन ग्रीड ठप्प झाले. 21 राज्यांत वीज गुल.
तामीळनाडू एक्स्प्रेसमध्ये आग : 30 जुलै रोजी आंध्र प्रदेशात एक्स्प्रेसमध्ये आग. 47 मृत्यूमुखी. बोगीत स्फोट झाल्याचे प्रारंभी सांगण्यात आले. त्यानंतर स्फोट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आसाममध्ये जातीय हिंसाचार : कोक्राझारमध्ये 19 जुलै रोजी दोन गटातील भांडणाला हिंसक वळण लागले. हा हिंसाचार 10 दिवस उसळला. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला.
इन्स्पेक्टरने दिली होती स्फोटाची कल्पना
पुण्यातील पोलिस इन्स्पेक्टर आर. जी. जाधव यांना 12 जून रोजी एक चिठ्ठी मिळाली होती. त्यात नमूद केले होते, ‘पुण्यात धमाके करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 15 ऑगस्टला हा कट नियोजित होता, परंतु येरवाडा तुरुंगात अतिरेकी कातिल सिद्दिकीच्या हत्येनंतर तारीख बदलण्यात आली. 13 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट करण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले होते. जाधव यांनी पोलिस आयुक्तांना या प्रकाराची लेखी माहिती दिली होती.
जनतेने घाबरुन जाऊ नयेः मुख्‍यमंत्री
स्‍फोटात हात असणा-यांना शोधून काढू. आताच काही निष्‍कर्ष काढणे चुकीचे आहे. तपासानंतरच निश्चित माहिती देण्‍यात येईल. हा दहशतवादी हल्‍ला होता अथवा नाही, याबाबतही आताच काही सांगणे अवघड आहे. परंतु, जनतेने घाबरुन जाऊ नये. दोषींना धडा शिकवू, असे मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी सांगितले.
आताच काही सांगणे घाईचेः गृहमंत्री आर. आर. पाटील
राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घटनास्‍थळाला रात्री उशीरा भेट दिली. ते म्‍हणाले, आम्‍ही सर्व दृष्‍टीने तपास करीत आहोत. चौकशी करुन अहवाल पोलिस अधिकारी देतील. कोणत्‍याही व्‍यक्तीला अद्याप अटक करण्‍यात आलेली नाही. तपास सुरु आहे. सर्व तपास यंत्रणांचे एक पथक तयार करण्‍यात येणार आहे. हा दहशतवादी हल्‍ला आहे की कोणाचा खोडसाळपणा आहे, हे तपासानंतरच कळेल. आताच काहीही सांगणे घाईचे ठरेल, असे आर. आर. पाटील म्‍हणाले. कोणत्‍या प्रकारची स्‍फोटके वापरण्‍यात आली, हे फॉरेन्सिकचा अहवाल आल्‍यानंतरच स्‍पष्‍ट होईल, असेही ते म्‍हणाले.
बुधवारीच सुशीलकुमार शिंदे पुण्यात येणार होते...
बुधवारीच देशाच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे सुशीलकुमार शिंदे हे आजच संध्याकाळी पुण्याला येणार होते. टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार होते. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम होणार होता. मात्र, गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यामुळे त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला.
PHOTOS : चाळीस मिनिटांत झाले चार स्फोट
अतिरेकी हल्ला नाकारता येत नाही - केंद्रीय गृहसचिव
PUNE BLAST : 'बॅगेत काय ठेवलंय बघायला गेल्यावर झाला स्फोट'
पुण्यात या ठिकाणी झाले चार लहान स्वरुपाचे बॉम्बस्फोट...
नवी दिल्ली आणि मुंबईत हायअलर्ट जारी
पुणे धर्मशाळा झाली, सरकार आता तरी शहाणे होणार का - विरोधीपक्षाचा सवाल